मोनोरेल मी जॉईंट केल्यानंतर अनेक मित्र झ्हाले . परंतु काही मित्र हे खास आठवणीत राहावे असे , त्यातीलच एक म्हणजे अवधूत .
अवधूत आठवणीत राहण्यामागचे कारण म्हणजे अवधूतचे बरेचसे सेक्रेटस मला आणि माझंही बरचसे त्याला माहिती आहे. मला माझ्या पर्सनल life मध्येही त्याने अगदी मोठया भावाप्रमाणे मला मार्गदर्शन केलं आहे .
सर्वांशी मिळून मिसळून राहणारा , कोणाशी भांडण केलं आहे ह्याने , असं मला गेल्या 3.5 वर्षात तरी कधीच ऐकू नाही आलं , अरे हो - पॉल सरांसोबत केलं होतं .
शांत स्वभावाचा वगैरे असं काही नाही आहे -पण मनमोकळा नक्कीच आहे .कोणाला काही सल्ला द्यायचा असल्यास छान समजावून पण सांगतो .
Comms department चे स्वप्न पाहणाऱ्या ह्या अवधूत ला अचानक OCC ची संधी आली , त्याने ती उत्कृष्ट पणे पेलली सुद्धा !
असा एकही कॅप्टन नाही ज्याने काहीच कांड केले नाहीत , मोनोरेल च्या इतिहासात Stinger तोडून अवधूत ने Scomi मध्ये स्वतःचे नाव उज्वल केले आहे . असा हा हिरो !
आता विवाहबंधनात अडकलेल्या ह्या परफेक्ट माणसाच्या आयुष्यात एकाचवेळी नव्या नोकरी ची संधी हि आली , हे ह्याच भाग्यच ।
छोकरी सोबत त्याला नोकरीही मिळावी , हे ह्याच्या कुटुंबाचे शुभ पायगुणच अवधूत ने समजले पाहिजे .
अवधूतला त्याच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा !!