हा s s काय !!!
मध्यम उंची , कुरळे केस , चष्मा , शर्टचे इन कुठूनसे निघालेले - , बाकदार चाल अशा ऐटीचा माझा दोस्त 'अक्षय दाभोलकर '. मोनोरेल च्या job ला आम्ही एकत्रच काम केले . अत्यंत साधा दिसणारा अक्षय साधा मुळीच नाही हे प्रत्येकाला ठाऊक आहे . मस्ती चे किडे ह्याच्या अंगात मनसोक्त खेळतात .OFFICE ला TIME वर येण्याचे अक्षय चे वांदे होते . तसा सगळ्यात जवळ राहणारा BIKE वापरणारा असला तरी हा १० मिनिटे उशिराच !!
एकदा अक्षय ची आणि मी NIGHT SHIFT होती . हा BIKE ने येणार असल्याने मी त्याला SION ला भेटायला सांगितले. हा भाई , आधीच घरातून उशिराच निघाला , आणि जो भरधाव निघाला तो SION BYPASSS करून OFFICE ला पोचला सुद्धा ! मी HIGHWAY ला उभा राहून फोन वर फोन करतोय पण हा कसला उचलतोय !!! FINALLY ह्याने फोन उचलला आणि बोलतो , " अरे अरे sorry sorry मी विसरूनच गेलो , आता मी office ला पोचलोय . तू ये taxi करून " असला माझ्या डोक्यात गेला ना हा , काय सांगू !!! असो ! पण त्यानंतर कधी असा वाईट अनुभव नाही आला .
मनाने प्रेमळ , helpful ( not for extra loop ) , आणि मनसोक्त समोरच्याची खेचणारा असा हा माझा मित्र आता further studies साठी U.S. ला जात आहे . U.S. तर आम्ही फक्त जगाच्या नकाशावर पाहून समाधान मानतो तिथे हे राव २ years studies साठी जात आहे . U.S. चे ticket confirm झाले तेव्हा मला बोलला ," आधी excitement होती रे राहुल , पण आता tension पण येतंय , कसं होईल ? " मी म्हणालो , " tension आले ना कि watsapp calling कर आम्हाला " . अक्षय भावुक झाला होता . ह्याच्या send off time ला मी नेमका Goa ला असल्याने attend नाही करू शकलो .
माझ्यातर्फे आणि संपूर्ण मित्र परिवारातर्फे
अक्षयचे
हार्दिक अभिनंदन !!
- राहुल गुरव
२ एप्रिल २०१५