Friday, December 16, 2016

शाबासकी

16/12/2016

नेहमी प्रमाणे ट्रेन घेऊन मी वडाळा ला परतलो होतो . कॅब मधून बाहेर येताच एका व्यक्तीने मला गाठलं , मला विचारू लागला , आप चला रहे थे ना , बहुत मस्त लगा , मै पहिली बार आया मोनोरेल मे । आप सही चला ते हो ।
  त्याची स्तुती सुमने अंबद्न्य म्हणून स्वीकारली आणि मी माझ्या ब्रेक ला निघून गेलो .
   दुसऱ्या loop साठी पुढच्या लूप नंतर परत वडाळा ला आलो तेव्हा परत तो माणूस समोर येऊन हात मिळवू लागला . म्हंटलं , आप वापस ? तो म्हणाला , मेरा काम हो गया । अब  वापस जा रहा हु ।
   मी ok म्हणून निघालो , तर तो माझ्या मागे मागे आला , आणि विचारू लागला , आप अभी यह ट्रेन लेके नही जा रहे क्या ?
   मी : नही । अभी मेरा ब्रेक है , इसके बाद के बाद का ट्रेन मेरा है ।

त्या व्यक्तीने गोंधळून इकडे तिकडे पाहिलं , मला विचारलं , " आप को वापस आने मे कितना समय लगेगा ? "
मी : 30 मिनिटं
तो : ठीक है । मै प्लॅटफॉर्म पे intazaar करता हूं । लेकीन मुझे आप चलाते वक्त हि जाना है ! आप मस्त चलते हो ।
  मी ऐकून खुश झालो , पण त्याला 30 मिनिटे थांबवणे योग्य नव्हते , मी बोललो त्याला
" आप ये ट्रेन से जाईये , ये कॅप्टन भी मस्त चलाता है । "
तेव्हा कुठे तो गेला .

ऑफिस च्या ह्या धामधुमीत शाबासकीची अशी थाप मिळाली की काम करायला नकळत उत्साह येतो .

Ambadnya

No comments:

Post a Comment